नवोदय विद्यालय तुळजापूरच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने ५०० स्वच्छता कीटचे वाटप.

(दि १६/०५/२०२०कंळब प्रतिनिधी )


         कोविद-19 जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक जाणिवेतून जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूरच्या माजी विद्यार्थ्यांनी कळंबतालुक्यातील १००% पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच करोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देणाऱ्या समाजघटकांना ५०० स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले. एका कीट मध्ये कापडी मास्क -४, १०० मिलीं सॅनिटायझर-१, लाईफबॉय साबण-१ व -२ बिस्कीट पुढे देण्यात आले. 
       पुणेस्थित इंजि.गोपीनाथ खरटमोल व्हाट्सअप्प ग्रूपवर वर्गमित्रांना आवाहन केले असता सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत काही तासात ₹60,000 त्यांच्या बँक खात्यावर जमा करून मदतीचा हात पुढे केला. बाभळगांव तालुका कळंब येथील प्रा.तुषार वाघमारे यांनी सर्व साहित्याची खरेदी करून स्वगृही गावातील बालाजी आण्णा वाघमारे, दत्तात्र्य वाघमारे, समाधान वाघमारे,  अभिजित वाघमारे यांच्या मदतीने ५०० कीट तयार केल्या, , व वर्गमित्र डॉ.शाम चौधरी, डॉ.दयानंद चौरे, श्री.विकास यादव, श्री.विशाल गंभिरे, सौ.अलका अडसूळ,आदींच्या माध्यमातून साहित्य गरजुंनपर्यंत पोचवण्याची जबादारी पार पाडली. या उपक्रमासाठी सौ.स्वाती खारटमोल, डॉ.विशाल तांबडे, डॉ.अतुल ढगे,डॉ.अविनाश जाधवर,इंजि. प्रशांत जाधव, पंकज कावळे,रवी यादव,अमोल लोंढे,ओंकार भुजबळ, राजा मोटे,सुधीर निकम, वगिश स्वामी, कैलास माने, सुशील भोसले, प्रशांत सदाफुले,अवधूत परितकर,विठ्ठल नागणे यांनी योगदान दिले.
 घरातील व्यक्तींच्या मस्कची आडलाबदल होऊ नये यासाठी चार वेगवेगळ्या रंगाचे मास्क दिले गेले.
@ घरातील लहान मुलांना वापरता यावे यासाठी एक किट मध्ये वेगवेगळ्या साईझ चे मास्क उपलब्ध करून दिले.
@ २००० मास्क ग्रामीण भागातील महिलांकडून योग्य दर देऊन शिवून घेतले यामुळे जवळपास १० महिलांना रोजगार उपलब्ध करवून दिला.
@ नवोदय मधील आमचे सर्वांचे शिक्षण सामान्य लोकांच्या पैशावर झालेले आहे, त्यामुळे अडचणीच्या काळात समाजासाठी योगदान देणे ही आमची नैतिक जबाबदारी असून, एवढे करून न थांबता यापुढेही मोठे काम उभा करण्याचा मनोदय प्रा.तुषार वाघमारे यांनी व्यक्त केला.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget