पाथर्डी गावाला खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांनी दिली भेट

कळंब प्रतिनिधी.दि .१५/०५/२०२०

पाथर्डी ता.कळंब येथे कोरोना बाधित रुग्ण आढळुन आले असल्याने आज गावास भेट दिली.
पाथर्डी गावातील दोन रुग्ण काल कोरोना पॉझिटिव्ह मिळुन आलेले आहेत,या परिस्थितीत गावात प्रशासनाने नियोजनबद्ध उपाययोजना कराव्यात,तसेच प्रतिबंधित क्षेत्रात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे काटेकोर अंमलबजावणी करावी अशा सुचना दिल्या.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय, कळंब या ठिकाणी उपचार करण्यात येत आहेत.पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणुन परमेश्वराला प्रार्थना करतो.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आपली जबाबदारी पार पाडत आहेत अशा वेळी जनतेनेही प्रशासना मार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करावे.नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, अत्यावश्यक कामा व्यतिरिक्त घराबाहेर पडु नये.

यावेळी खासदार श्री.ओमदादा राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील उपस्थित होते , यावेळी उपविभागीय अधिकारी सौ.अहिल्या गाठाल-होळे मॅडम, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी श्री.वडगावे,गटविकास अधिकारी श्री.राजगुरू, तालुका अधिकारी डॉ.जाधव आदी उपस्थित होते.


Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget