कळंब प्रतिनिधी ..
दि.१५/०५/२०२०
कळंब तालुक्यात कोरोना ने धडक दिल्याने प्रशासनानचे कडक पाऊल
कळंब तालुक्यात तिन कोरोना रुग आढळून आल्याने पोलिस प्रशासनाने कळंब शहरात जागोजागी चेक पोस्ट अधिक कडक करण्यास सुरुवात केली आहे.बाहेर विनाकारण फिरणारे वर दंडात्मक कारवाई करत आहेत. शहरातील अत्यावशक सेवा वगळता इतर आस्थापने बंद केली आहेत . कळंब तालुक्यात तीन रुग्ण आढळून आल्यानंतर कळंब शहर आणि तालुक्यात काही अत्यवश्यक सेवा आणि जीवनावश्यक दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने आणि आस्थापना बंद केली आहेत.शहर पुर्ण पणे बंद आहे.कळंब शहरातील दत्त नगर ,शिवाजी नगर हा भाग सिल केला आहे .जागोजागी रस्ते अडवले आहेत.पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त केल्याने शहराबाहेरील व्यक्ती शहरात येणार नाही याची खबरदारी पोलिस प्रशासन घेत आहेत .
काल पासून कळंब शहर पूर्णपणे बंद केले आहे .कळंब तालुक्यात काल पासून 17 मे 2020 पर्यंत फक्त अत्यावश्यक सेवा, किराणा दुकान सकाळी 8 ते दुपारी 2 सुरू राहतील. तर प्रतिबंधित क्षेत्र आजपासून देि.30/05/2020 पर्यंत पूर्णपणे बंद / सिल राहील राहणार आहे असे निर्देश उपविभागीय दंडाधिकारी अहिल्या गाठाळ यांनी काढले आहेत . उपजिल्हा रूग्णालयाकडून तपासणी करण्याकरीता येण्यासाठी लोकाची योग्य खबरदारी घेतली जात आहे.व तपासणी करत आहेत.

Post a Comment