उपविभागीय दंडाधिकारी अहिल्या गाठाळ यांनी स्वखर्चाने आरसेनिक अल्बम ३० औषध केले वाटप .


( पत्रकार सतिश टोनगे कळंब )

कळंब- उप विभागीय दंडाधिकारी अहिल्या गाठाळ यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या घटकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी स्वखर्चाने आरसेनिक अल्बम ३० हे औषध उपलब्ध करून त्याचे वाटप केले आहे.

कोरोनाच्या या युद्धात महसूल कर्मचारी,पोलीस बांधव, नगर परिषद कर्मचारी, पत्रकार बंधू जीव धोक्यात घालून या रोगाशी दोन हात करीत आहेत. त्यामुळे अनेकदा त्यांचे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होत आहे. यातच त्यांना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, तसेच त्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कळंबच्या उपविभागीय दंडाधिकारीयांना अहिल्या गाठाळ यांनी डॉ. दशरथ यांनी तयार केलेले होमिओपॅथीतील आरसेनिक अल्बम ३० या औषधांचे पॅकेट स्वखर्चाने विकत घेऊन सर्व कोरोनाशी दोन हात करणाऱ्या घटकांना वाटप केले आहे. हे औषध कोरोनाशी दोन हात करणाऱ्या या घटकांसाठी संजीवनी ठरणार आहे.नागरिकांनी हे  औषध वापरावे असे आवाहन आहिळ्या  गाठा ल यांनी केले आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget