कळंब-(प्रतिनिधी) -
आहे.गेली दहा दिवसापासून या रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.अखेर रूग्णालयाच्या व
तीने त्याचे उपचारादरम्यान पुन्हा स्वॅब पाठवण्यात आले होते त्याचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.त्यामुळे या उपजिल्हा रुग्णालयातुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यावेळी त्यांना रूग्णांतील कर्मचाऱ्यांनी भावनापूर्ण फुलांचा वर्षाव व टाळ्यांचा कडकडाट करत गावाकडे जाण्यासाठी निरोप देण्यात आला.यावेळी रूग्णांसह उपस्थित सर्वांचे डोळे पानवाले होते.गेली दहा दिवसापासून उपचार करणाऱ्या आरोग्य दुताचे रुग्णांनी हात जोडुन आभार मानले.तसेच पाथर्डी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच रंजना पिंगळे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ,तहसीलदार मंजुषा लटपटे,नायब तहसीलदार अस्लम जमादार,वैद्यकीय अधिक्षक डॉ.जिवन वायदंडे,गटविकास अधिकारी, नामदेव राजगुरू, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे,भाजपाचे नेते अजित पिंगळे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीपकुमार जाधव,डॉ.रामकृष्ण लोंढे,डॉ.सुधीर आवटे,डॉ.निलेश भालेराव,नगरसेवक सतीश टोणगे,माजी नगरसेवक शिवाजी कराळे,पाथर्डी सरपंच सौ.रंजना पिंगळे,उपसरपंच अर्जुन जाधव,पोलीस पाटील बालाजी चिंचकर यांच्यासह रूग्णांलयातील ईश्वर भोसले यांच्या कर्मचारी,पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.
गोंधळी कलाकारांनी आपल्या गाण्यातून उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी यांच्यासह कोरोना युध्दामध्ये सहभागी असणाऱ्या कोरोना योध्दे यांच्या प्रती आपल्या गाण्यातून कृतघ्नता व्यक्त केली.तसेच कोरोनाची परिस्थिती जिल्हा प्रशासन अतिशय योग्य हाताळत असल्याने त्यांचे आपल्या गितातुन कौतुक यावेळी केले.

Post a Comment