उस्मानाबाद प्रतिनिधी दि.23/05/2020
*उस्मानाबाद जिल्ह्यातील ३०० गरीब व गरजू कुटुंबाना अन्न-धान्य किट वाटप*
लोकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नवोदय विद्यालय तुळजापूर आणि भारतीय प्रबंध संस्था (IIM) कोझिकोड (केरळ) च्या माजी विद्यार्ध्यांचा संयुक्त उपक्रम
जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर व देशातील नामंकित IIM कोझिकोड च्या माजी विद्यार्ध्यांनी एकत्र येऊन दुष्काळी व मागास उस्मानाबाद जिल्यातील खेडेगावांमध्ये राहणाऱ्या गरीब कुटुंबासाठी एक कुटूंबाला कमीत कमी १५ दिवस पुरेल इतके अन्न-धान्य व किराणा किट वाटप केले.
नवोदय आणि IIM कोझिकोड चे माजी विद्यार्थी श्री. गोपीनाथ खरटमोल यांच्या प्रयत्नातून IIM कोझिकोड च्या माजी विद्यार्थी संघटनेने या कार्यासाठी १.५ लाख रुपयाची मदत केली. या मदती सह नवोदय विद्यालय तुळजापूर च्या माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेत ३०० अन्न-धान्य किट्स बनवल्या, ज्यामध्ये गव्हाचे पीठ ४ किलो, तांदूळ २ किलो, तूर डाळ १ किलो, साखर १ किलो, खाद्य तेल 1 लि., मसाले, तिकट, हळद, भाज्या, साबण,टूथपेस्ट सह फळभाज्या इत्यादीचा समावेश होता. नवोदय चे माजी विद्यार्थी प्रा. तुषार वाघमारे यांनी या किट्स बनवून कळंब-उस्मानाबाद शहरांसह जवळपास २० पेक्ष्या जास्त गावामध्ये वाटप केले. मोहा, गौर, दहिफळ, बाभळगाव, वाघोली, शिंगोली,सौंदणा, एरंडगाव,बरमाचीची वाडी, शेलगाव (ज), धानोरा (शे), पिंपळगाव(डोळा), इटकूर, हासेगाव, आंदोरा,सतेफळ डिकसळ,मलकापूर इ. गावातील गरजूंना याचा लाभ झाला.
अंत्यत गरजू ज्यांना की उद्याची भ्रांत आहे अशा कुटूंबाना किंवा एकल व्यक्तींना यात प्राधान्य दिले. निराधार, दिव्यांग, कलाकार, हातावर पोट असणारे, ज्यांना काम करणे शक्य नाही अथवा परस्थिती चांगली आहे पण लाॅकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या कुटुंबाचा आवर्जून विचार केला.
यामध्ये डॉ. श्याम चौधरी, श्री. विकास यादव,सौ. अलका अडसूळ, या नवोदयच्या माजी विद्यार्थ्यांचे तसेच तालुक्यातील दत्तात्रय वाघमारे, पांडुरंग मते, योगराज पांचाळ, कौस्तुभ भातलवंडे,अशोक जगताप, बालाजी भातलवंडे,अभय परितकर,दत्ता कागदे रामा वाघमारे,उमेश मडके, औदुंबर धोंगडे, हनुमंत काळे,प्रवीण करडे, राजेंद्र तिबोले,विनोद तवले,दत्ता तवले, सुधीर लोमटे,रोहन देशमुख, प्रतीक अडसूळ, अतुल धुमाळ यांचे किट वाटपात मोलाचे योगदान लाभले.
कोरोनाच्या संकट काळात जिल्ह्यात परराज्यातून मदत आल्याचे हे दुर्मिळ उदाहरण आहे. यामध्ये व्हाॅटस् अॅप ग्रुपनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. लाॅकडाऊनच्या काळात प्रा. तुषार वाघमारे यांचे सामाजिक कार्य अविरत सुरुच होते. त्यांचे ऑनलाईन स्पर्धा, वन्य जीव रक्षणासाठी केलेले प्रयत्न, व नवोदयमार्फत सॅनिटायझेशन कीट वाटप याची सर्वत्र दाखल घेतली गेली, या सर्व उपक्रमांची माहिती व फोटो नवोदय विद्यालय व IIM च्या माजी विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये पोस्ट होत असत. प्रा. तुषार वाघमारे यांची सामाजिक तळमळ पाहून इतर माजी विद्यार्थ्यांनी त्याच्या उपक्रमांना आर्थिक बळ देण्याचा निर्णय घेतला व मदत कार्यात भर पडली.
काही दिवसापूर्वीच नवोदय विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी ५०० कुटुंबाच्या स्वच्छता व सुरक्षिततेसाठी सॅनिटायझर किट्स चे वाटप सुद्धा केले होते. माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.
*अन्न धान्य कीट वाटप दरम्यान अनेक गावांतील गोरगरीब लोकांचा संपर्क आला. प्रत्येक कीट मागे "एक कथा एक व्यथा" ऐकायला मिळत होती. त्यामुळे लोक नेमकं किती अडचणीत आहेत याची जाणीव खऱ्या अर्थाने झाली. यांच्यासाठी काहीतरी करता आले याचे खुप समाधान वाटते. याबद्दल IIMK चे गोपीनाथ खरटमोल,नितीन नायर,प्रतीक पत्की यांच्यासह स्वाती कटकधोंड यांचे विशेष आभार. तसेच आधीच्या विधायक उपक्रमाची डिजिटल व प्रिंट मीडियाने दखल घेतली त्यामुळे ही आर्थिक मदत मिळणे शक्य झाले. मदतीचा ओघ चालूच आहे त्यामुळे आशा प्रकारचे काम सुद्धा चालूच राहील असे प्रा.तुषार वाघमारे यांनी सांगितले.*
*कीट मध्ये*
*शेतकऱ्यांकडील विकत घेतले गहू दळून घेऊन कीट मध्ये समाविष्ट करण्यात आले.
*शिमला मिरची,कांदा, टोमॅटो, शेवगा,कोबी या माळव्याचा उपलब्धतेनुसार समावेश करण्यात आला होता.*
प्रत्येक गावातील गरजूंची यादी मागवण्यात आलेली होती, यादीनुसार वाटप करण्यात आले.
*अन्नधान्य सामग्री प्रत्येक गरजूच्या दारापर्यंत पोच करण्यात आली.*

Post a Comment