रविवार वगळता प्रत्येक दिवशी किराणा दुकान व सर्व आस्थापने सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत राहणार चालू .
उस्मानाबाद (प्रतिनिधी) - जिल्ह्यात किराणा दुकानासह सर्व आस्थापना सोमवार (दि.11) पासून ते शनिवार पर्यंत सुरु ठेवण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत. आता जिल्ह्यातील बाजारपेठ सहा तास सलग सहा दिवस सुरु रहाणार आहेत. बाजारपेठेत होणार्या गर्दीमुळे मार्गदर्शक सुचनांची पायमल्ली होत असल्याने गेल्या आठवड्यात सोमवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवशीच बाजारपेेठ सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र ट्रॅफीक कंट्रोल झाल्याने हा नव्याने आदेश देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी आज (दि.9) नव्याने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, जिल्ह्यातील किराणा दुकानासह सर्व आस्थापना सोमवार (दि.11) ते शनिवार या सलग सहा दिवशी सकाळी आठ ते दुपारी दोन या कालावधीत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुख्य बाजारपेठेत नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच वाहतुकीला अडथळा होवु नये यासाठी मुख्य बाजारपेठेकडे जाणार्या सर्व रस्त्यावर चारचाकी वाहनांच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. हा आदेश 17 मे पर्यंत म्हणजे आठवडाभर लागू असल्याचे जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मधून ढिल देण्यासाठी कांही आस्थापना चालू करण्यास तीन मे रोजी परवानगी देण्यात आली होती. मात्र चार मे रोजी बाजारपेठेत झालेल्या गर्दीच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकार्यांनी पाच मे पासून सोमवार, बुधवार, शुक्रवार आठवड्यातील तीन दिवस सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत सर्व आस्थापना सुरु ठेवण्यास नव्याने परवानगी दिली होती. यात चाळीस तासाचा लॉकडाऊन ठेवण्यात आला होता. किराणा दुकानासह भाजीपाला, बी-बियाणे, खते, शेत अवजाराची दुकाने, कपड्यांची दुकाने चालू रहाणार असून मंदिर, मस्जीद, शाळा, महाविद्यालये बंद रहाणार आहेत. 65 वर्षावरील व्यक्ती, गरोदर महिलांना बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. नोंदणीकृत बांधकाम मजूरांना बांधकामावर जाण्यास मुभा देण्यात आली आहे. जिल्हा अंतर्गत एस.टी. बससेवा सुरु करण्यास परवानगी दिली असू. घरगुती विवाहात दहा व्यक्तींना सहभागी होता येणार आहे. दुध विक्री रोज सुरु रहाणार असून कपडा विक्री करताना नियमांचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे.केशकर्तनालय मद्याची दुकाने बंदच रहाणार आहेत. पार्सलद्वारे चहा देता येईल. हॉटेलचे किचन सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंत सुरु रहाणार असून केवळ पार्सल देता येणार आहे. परवानगी देण्यात आलेल्या सेवा सुरुच रहाणार आहेत.
Post a Comment