अमर ताटे
४/०६/२०२०...
कळंब तालुक्यातील आतापर्यंत १८ कोरोनाचे पेशेंन्ट आढळले .तर मंगळवारी आंदोरा येथील एकाच कुटुंबातील 8 जणांचा स्वाॅब घेण्यात आला होता ,काल त्या कुटुंबातील 2 महिलांचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे . शिराढोण येथील महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 9 कोरोना पाॅझिटिव्ह व्यक्ती वर सध्या उपचार चालू आहेत .तर कोरोना या आजारापासून 8 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत .आंदोरा येथे तहसीलदार , पोलिस यंत्रणेनी भेट देऊन ज्या भागात हे पेंशेन्ट होते तो भाग सिल केला आहे ,तर गावकऱ्यांनी गावात बाहेरून येणारे रस्ते बंद केले आहेत, दरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर , आमदार राणाजगजितसिंह पाटील , आमदार कैलास पाटील यांनी आंदोरा गावात भेट दिली व गावातील नागरिकांशी संवाद साधला,व गावातील प्रत्येक कुटुंबाला सॅनिटाझर व अॅर्सेनिकम अल्बम 30 औषध उपलब्ध करून दिले. यावेळी तहसीलदार लटपटे मॅडम , गटविकास अधिकारी राजगुरू, पोलिस निरीक्षक दराडे उपस्थित होते. गावातील कोरोना सहाय्यता कक्षातील स्वयंमसेवक हे दक्षता घेत आहेत.लोकांनी शोसल डिस्टन्स पाळवा ,मास्क वापरले पाहिजेत ,आपले हात सोरखे स्वच्छ धुतले पाहिजेत असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ वायदंडे यांनी दैनिक संघर्ष ला माहिती देताना केले आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार राणाजगजितसिंह पाटील ,आमदार कैलास पाऊस यांनी भेट देऊन आंदोरा गावातील नागरिकांना सॅनिटाझर व अॅर्सेनिकम 30औषध उपलब्ध करून दिले


Post a Comment