कळंब प्रतिनिधी .दि २७/०५/२०२०
कोरोनाच्या संकटामुळे गत दोन महिन्यापासुन सर्व बाजारपेठ बंद आहे. त्यामुळे कळंब नगर परिषद, यांच्याकडे सहा महिन्याचे भाडे माफ करावे , तसेच मालमत्ता कर, पाणी पट्टी माफ करावी, जनतेला मास्क व वस्तू चे वाटप करण्यात यावे या मागणीचे निवेदन गट नेते तथा शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी कापसे यांनी दिले आहे.
व्यापार्यांवर खुप मोठे संकट आलेले आहे. लग्नसराई साठी अनेकांनी लाखो रूपयांचे कर्ज काढुन माल भरलेला आहे. येणार्या काळात तो कधी विकला जाईल की खराब होईल ते सांगता येत नाही. तसेच अनेक कारागीरांची वर्षभराची कसर लग्नसराई मध्ये निघुन जाते. लग्नसराई तर संपली आहे. त्यामुळे अनेकांचे अतोनात नुकसान झाले आहे. बाजारपेठ कधी सुरळीत होईल सांगता येत नाही, त्यामुळे बंद असलेल्या काळाचे दुकान भाडे द्यायचे कोठुन ? असा प्रश्न गाळेधारकां समोर उभा आहे.
न प हद्दीतील गळे धरकांचे सहा महिन्याचे भाडे माफ करून व्यापार्यांना व कारागिरांना नव्याने व्यवसाय उभारणी करण्यासाठी उर्जा द्यावी, तसेच मालमत्ता कर व पाणी पट्टी माफ करावी या मागणीचे निवेदन मुख्या धिका री यांना देण्यात आले. या वेळी न प उपाध्यक्ष संजय मुंदडा नगर सेवक सतीश टोणगे उपस्थित होते.

Post a Comment