राहगृह येथील तोडफोडीचा लाल पँथर संघटनेच्या वतीने निषेध

कळंब दि.9/07/2020


राहगृह येथील तोडफोडीचा लाल पँथर संघटनेच्या वतीने निषेध 

लाल पँथर संघटनेच्या वतीने राजगृह येथील तोडफोडीचा निषेध नोंदविण्यात आला व कळंब उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री ना निवेदन देण्यात आले . मुंबई येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानी अज्ञात व्यक्तीने केलेल्या तोडफोड तसेच घराच्या काचाची तोडफोड करण्यात आली आहे यात घराच्या परिसरातील CCTV कॅमेरा ची तोडफोड करण्यात आली आहे.राजगृह हे समस्त आंबेडकरी जनतेचे ऊर्जास्रोत आहे . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हे घर पुस्तकांसाठी तयार केले आहे.आणि येथे अशा प्रकारे तोडफोड केल्याने समस्त आंबेडकरी जनतेच्या मनात रोष निर्माण झाला आहे.तरी तोडफोड करणाऱ्या अज्ञात व्यक्तीला तात्काळ अटक करावी व अॅड बाळासाहेब आंबेडकर व त्यांच्या पुर्ण कुटुंबाला Z + सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी लाल पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई बजरंग ताटे यांनी केली आहे .या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सौ माया शिंदे ,बालाजी गायकवाड, सुनिल कांबळे , संगिता बिक्कड , सुनिल गायकवाड,शरद झोंबाडे, यांच्या स्वाक्षर्या आहेत.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget