कोरोना योद्धा पुरस्काराने पत्रकार हनुमंत पाटुळे यांना सन्मानीत

कोरोना योद्धा पुरस्काराने पत्रकार हनुमंत पाटुळे यांना सन्मानीत 

खामसवाडी दि. २(प्रतिनिधी)कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे दि. १आँगस्ट रोजी साहीत्यरत्न लोकशाहीर डाँ.अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व जयंती निमित्त जनस्वराज्य फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र युवा पत्रकार संघ यांच्या वतीने साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती चे औचित्य साधून कोरोना काळात कार्य करणार्या कार्यकर्त्यांचा "कोवीड योध्दा" पुरस्कार जनस्वराज्य फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.लहु पारवे सर यांच्या हस्ते मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी संस्थापक अध्यक्ष लहु पारवे सर,गावचे उपसरपंच प्रभाकर शेळके,बाबु नाना शेळके,पोलीस जमादार शौकत पठाण,पत्रकार शिवाजी बोबडे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोळी, बंडु ताटे,संपत थोरात,साहेबराव गायकवाड सुमीत वाघे, मकबुल शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget