दिनांक २२/०८/२०२०

( प्रतिनिधी परवेज मुल्ला ) : – कळंब शहराच्या मध्यवर्ती विविध खेळासाठी कोट्यावधी रूपये खर्चून बांधलेले क्रिडा संकूल अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे सध्या विविध समस्यानीं घेरले असून त्या ठिकाणी आता दारूडयांनी त्यांचा अड्डाच बनवून ठेवल्याचे चित्र दिसत आहे .
सविस्तर माहिती अशी की कळंब तालूक्यातील विविध प्रकारच्या खेळाडू सांठी सराव करण्यासाठी जवळ पास एवढ्या मोठया जागेत भव्य क्रिडा संकूल असून त्या क्रीडा संकुलाचे जवळपास ७० लाख रुपये खर्चुन मोठी इमारत गेल्या तीन वर्षापुर्वीच उभारली आहे इतर खेळांसाठी रिकामा परिसर ही मोठा आहे मात्र जिल्हा क्रिडा अधिकाऱ्याच्या दुर्लक्षीत धोरणामुळे या क्रिडां संकुलामध्ये सध्या चारही बाजूंनी घाणीचे साम्राज्य व झाडाझुडप्याने रिकामे मैदान व्यापून गेले आहेत त्याच परिसरात हातभट्टी चे दुकान सुदधा कांही नागरीकांनी थाटले असून त्यामुळे सध्या क्रिडा संकुलाच्या भव्य इमारतीच्या समोरच दारूड्यांचा मोठया प्रमाणात गोधळ दररोजच चालू असतो, इमारतीचे दरवाजे, खिडक्या चोरट्यांनी गायब केल्या आहेत कंपाऊड वॉलचे लोखंडी गेटही चोरीला गेले आहे त्यामुळे शासनाने तालुक्यातील विविध प्रकार च्या खेळाडूसांठी लाखो रूपये खर्च करून बांधलेल्या क्रिडा संकू लाची अवस्था अतिशय दयनीय झालि असून कमीत कमी जिल्हा अधिकांर्‍यांनी च या गंभीर बाबीकडे लक्ष घालून विविध समस्या च्या विळख्यात सापडलेल्या क्रिडा संकूल खेळाडू्साठी वाचवावे अशी मागणी कळंब शहरसीयांकडून केली जात आहे

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget