शिवसेना नगरसेवक सतिश टोनगे यांचे उपविभागीय अधिकारी याना निवेदन
कळंब.. प्रतिनिधी अमर ताटे
पॉझिटिव्ह निघालेले कोव्हिड चे रुग्ण बिनधास्त पने बाजारपेठेत फिरू लागले असून, त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही, त्यामुळे होम आयसुलेशनची सुविधा बंद करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक सतीश टोणगे यांनी केली आहे.
उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहराजवळच्या गावामध्ये कोव्हिड च्या रुग्णामध्ये वाढ होऊ लागली आहे, व त्यांचा संपर्क हा शहरातील नागरिक , व्यापारी यांच्याशी होत असल्याने शहरातील रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पॉझिटिव्ह निघालेले रुग्ण होम आयसुलेशन च्या नावाखाली बिनधास्त पने शहरात फिरू लागले आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांना प्रशासनाची भीती राहिलेले नाही, शासनाच्या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. या पुढील काळा त रुगणसंख्या कमी करण्यासाठी पॉझिटिव्ह निघणाऱ्या प्रत्येक रुग्णांस शासकीय कोव्हिड सेंटर मध्ये ठेवण्याची मागणी नगरसेवक सतीश टोणगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.




