नियतीने कुंकू ही हिरावून नेले... बोलता ही येत नाही.....लॉक डाऊन मुळे होतायत हाल

,


( दि ११/०५/२०२०, कळंब प्रतिनिधी सतीश टोनगे ,)

      जन्मताच निसर्गाने "वाचा" हिरावली व नियतीने दोन वर्षांचं 'मुल' पदरात टाकुन कपाळाचं कुंकूही पुसलं,नंतर आई-वडीलांच्या आश्रयाला आलेल्या अश्विनी चव्हाण व तिच्या मुलाचा उदरनिर्वाह तिचे वडील अंबादास घोटकर हे भिक्षा मागून करायला लागले,अंबादास यांची दुसरी मुलगीही जन्मताच दिव्यांग असून तिलाही बोलता येत नाही,आता"कोरोना"नं कहर केला,आणि भटक्या जमातीतील "गोंधळी"समाजाचा जागरण-गोंधळाचा पारंपारिक व्यवसाय आणि भिक्षुकीही बंद झाल्याने,कुटूंबावरच उपासमारीची वेळ आली,ही हृदयद्रावक कहाणी मौजे पिंपळगाव (डोळा)ता.कळंब येथील आहे,
     याबाबत कळंब येथील सामाजिक कार्येकर्त संतोष भांडे,यांना ही माहीती मिळताच  त्यांचे वतीने किराणा मालाचे दोन किट तसेच मास्क चे तेथे मोफत वाटप करणेत आले 
          ,कळंब तालुक्यातील विमुक्त-भटक्या जमातीतील अनेक जाती-जमाती या आजही भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करतात,अशी अनेक कुटुंबं कळंब तालुक्यात आहेत, त्यांना मदत करण्याकरीता,समाजातील अनेक प्रतिष्ठितांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget