उमरा येथील प्रविण जाधव घेतायत झाडांची काळजी

कळंब प्रतिनिधी .



कळंब तालुक्यातील उमरा येथील युवक प्रविण जाधव यांनी लाॅकडाउन तसेस कडक उन्हाळ्यामध्ये सार्वजनीक ठिकाणी लावण्यात आलेल्या झाडांना जगवण्यासाठी धडपड सुरु आहे. उमरा/परतापुर येथील माऊली मंदीरावर गेल्या वर्षी जुलै महिन्यात युवकांनी एकत्र येऊन २०० झाडे लावली होती. त्यांच्या जोपासनेची सर्व जबाबदारी प्रविण जाधव योग्य प्रकारे पार पाडत आहेत. 

आपल्या गावाबद्दल असलेले प्रेम व सामाजिक भान याची जाणिव ठेवत प्रविण जाधव यांनी वृक्ष लागवडीचा संकल्प हाती घेतला होता. यासाठी त्यांनी गावातील तरुणांची जन्मभूमी उमरा आहे व कर्मभूमी वेगळी आहे अशा तरुणांना प्रोत्साहीत केले होते. त्यांच्या या प्रोत्साहनामुळे अनेक तरुणांनी आर्थिक मदत करुन सहभाग घेतला. यामध्ये नाशिक येथील जिल्हा न्यायाधिश संजय जाधव, सैन्य दलातील सतिश शिंदे तसेच प्रा. संदिप जाधव, प्रा. प्रदिप जाधव, अजय जाधव, श्रीकांत जाधव, अतुल जाधव, योगेश गायकवाड आदिंनी सहकार्य केले आहे.तसेच प्रविण जाधव यांची धडपड पाहुन प्रा. जगदिश गवळी यांनी गॅचरल शुगर कारखान्याचे चेअरमन यांच्याकडुन १५० झाडे उपलब्ध करुन दिली. सहका-यांनी व इतरांनी दाखवेल्या विश्वासास ते लावलेल्या सर्व झाडांचे संगोपन व संवर्धन करुन पात्र ठरत आहेत. आपल्या देशावर तसेच जगावर कोरोणा महामारीमुळे लाॅकडाउन सारख्या भिषण परिस्तिथीत देखील ते वारंवार वृक्षांकडे स्वत: जबाबदारीने लक्ष देत आहेत. कळंब येथे रहात असताना गावाकडे हिरवळ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणा-या युवकाला गावक-यांचाही प्रतिसाद मिळत आहे. बाहेरगावी असलेल्या मंडळीची गावाप्रती तळमळ पाहुन आता गावातील कांही लोकांनीही वृक्ष संगोपनाच्या उपक्रमाला हातभार लावला आहे. स्थानिक शंकर जाधव, विक्रम जाधव, राजाभाऊ जाधव यांच्यासह अमर जाधव, किरण जाधव, पोपट जाधव हेही वृक्ष संगोपनास मदत करत आहेत. प्रविण जाधव आठवड्यातुन दोन वेळा गावी जाउन वृक्षांना पाणी घालत आहेत. यामुळे १३० हुन अधिक झाडांचे संवर्धन झाले आहे.

भारतीय वंशाच्या या रोपांचीही होतेय जोपासना.. उमरा येथे ज्ञानेश्वर मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या रोपांमध्ये वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब, जांभुळ, आंबा, सिताफळ, सप्तपर्णी, आवळा, रेनट्री यांचा समावेश आहे.

झाडांची घेतली जाते काळजी.. कोरोणा विषाणुच्या संसर्गामुळे सरकारने लाॅकडाउन केले आहे. आपण लावलेली झाडे पाळ्याअभावी जळुन जातील म्हणून ते खचुन न जाता झाडांच्या बुडाला नारळाचे टरफल आणि गव्हाचे काड टाकुन पाणी दिले जात आहे. यामुळे उन्हाळ्यातही हे झाडे जिवंत आहेत. वेळप्रसंगी प्रविप जाधव या युवकाने खांद्यावर तसेच सायकल वरुन पाणी आणुन झाडांना पाणी दिले आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget