कोरोनाच्या संकटात अन्नदान हे महादान : मारुती बनसोडे



उस्मानाबाद,दि.११(प्रतिनिधी):कोरोनाच्या या भयानक संकटामध्ये मजूर, गरीब ,गरजू,विधवा ,निराधार , वृद्ध यांना अन्नदान करणे म्हणजे महादानच आहे. असे मत वंचित बहुजन आघाडीचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष मारुती बनसोडे यांनी व्यक्त केले. 
वागदरी( ता. तुळजापूर )येथे १० मे रोजी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष खा.  प्रकाश आंबेडकर यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच  ज्ञानेश्वर बिराजदार हे होते. यावेळी १६ गरजूना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. ८ मार्च रोजी इथे वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन करण्यात आली होती. त्या शाखेनी आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. याच गावात वंचित च्या महिला आघाडीने पाच किलोचा केक 
कापून बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या कार्यक्रमात फिजिकल डिस्टन्सचे पालन करण्यात आले. या कार्यक्रमास उत्तम झेंडारे ,उमेश गायकवाड , शाखा अध्यक्ष सुदर्शन बनसोडे , अंकुल वाघमारे ,अमोल वाघमारे , मुकेश धाडवे , परमेश्वर भंडारे , महिला आघाडीच्या कोमल झेंडारे , श्रीदेवी वाघमारे ,गुणाबाई बनसोडे ,मुक्ताबाई वाघमारे (ग्रा.पं. सदस्या)  उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक व सुत्रसंचलन आर.एस.गायकवाड यांनी केले तर आभार अंकुश लोखंडे यांनी मानले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget