(दहिफळ-प्रतिनिधी-योगराज पांचाळ) दि.१३/०५/२०२०
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील वैष्णवी वसंत कांबळे इयत्ता ९वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थीनीने न्युज पेपर पासुन सुंदर ड्रेस तयार केला आहे.लॉक डाऊनच्या काळात घरबसल्या सुचली कल्पना विशेष म्हणजे हा ड्रेस अंगावर घालता येतो.हस्तकले मुळे कागदापासुन विविध वस्तु बनविण्याचा छंद तिला आहे.लॉकडाऊन मुळे घरात बसुन विरंगुळा म्हणुन वैष्णवी कागद घेऊन वस्तु बनवित होती सहज तिला कल्पना सुचली न्युज पेपर घेऊन तिने व्यवस्थीत कात्रन करुन तब्बल तीन तास वेळ खर्ची घालुन सुंदर ड्रेस तयार केला.सुबक नक्षीदार आकर्षक तयार केलेला ड्रेस तिने अंगावर घालुन पाहिला.बघणा-याला विश्वास बसत नाही की हा कागदाचा ड्रेस आहे.परंतु तिने मेहनत घेवुन तो ड्रेस तयार केला आहे.तिच्या कल्पकेचे कौतुक तर होत आहेच..परंतु तिच्यातील भावी फॅशन डिझायनर आकार घेऊ लागला आहे.वैष्णवीने बनविलेला ड्रेस सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर खुप गाजला आहे .तिच्या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment