कळंब... प्रतिनिधी .दि.१३/०५/२०२०
वधुपित्यांने नवदापंत्याच्या हातून लग्नाच्या खर्चात बचत झालेल्या रक्कमेमधून ५१ हजाराची आर्थीक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली आहे.
तालुक्यातील शेलगाव दि. येथे अतिशय साध्या पद्धतीने उच्चशिक्षित वधु-वरांचा शेतामधील निसर्गरम्य आमराईत विवाह लावण्यात आला. यावेळी वधुपित्यांने नवदापंत्याच्या हातून लग्नाच्या खर्चात बचत झालेल्या रक्कमेमधून ५१ हजाराची आर्थीक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली आहे.
तालुक्यातील शेलगाव दिवाणे येथील रहिवासी व जिल्हा परिषद प्राथमीक शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या भक्तराज दिवाणे यांची आयटी इंजिनिअर असलेली एकुलता एक कन्या प्रियंका हिचा विवाह गोविंद शिवाजीराव जाधव रा. ढाकणी ता लातूर या स्थापत्य अभियंत्याशी निश्चित झाला होता.परंतु, नियोजित १२ मे ही विवाह तिथी लॉकडाऊनच्या बंधनात अडकल्याने प्रशासनाच्या निर्देशांच्या पालनाचा प्रश्न उभा ठाकला.
यामुळे अगदी बँड बाजा ते मंगल कार्यालय असे सारं नियोजन 'बुक' झालेलं असताना,इतर सर्व तयारी झालेली असताना दिवाणे व जाधव परिवाराने साधेपणाने अन् मोजक्या लोकांच्या उपस्थित कार्य उरकरण्याचा निर्णय घेतला. यानुसार मंगळावारी स्वतः च्या शेतामधील आमराईत चार-चौघांच्या उपस्थित हा विवाह सोहळा संपन्न झाला.
यावेळी मोजकी लोक उपस्थित असली तरी सोशल व फिजीकल डिस्टन्स,सॅनिटायजर वापर, हात धुण्याची सोय अशी सर्व ती सुरक्षेची काळजी घेण्यात आली होती. जे काही मोजके आप्तस्वकीय उपस्थित होते त्यांनाही तीसेक फुट अंतरावर असलोल्या एका एका आमृवृक्षाच्या सावलीत सोशल डिस्टन्स ठेवून बसवण्यात आले होते.
एकूणच कोणताही थाटमाट नसलेला,बँड ना, बारात असलेला हा निसर्गाच्या सान्निध्यात व काळ्या वावरात संपन्न झालेला हा आगळावेगळा असा विवाहसोहळा ठरला आहे.
या विवाह सोहळ्यात सामाजीक भान जपत शिक्षक संघाचे प्रदेश चिटणीस तथा वधुपिता भक्तराज दिवाणे यांनी लग्नाच्या खर्चातून वाचलेल्या रक्कमेतून ५१ हजाराची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस करण्याचा संकल्प केला होता.सोहळ्यास उपस्थित असलेल्या खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील यांच्याकडे नवदापंत्यानी याचा धनादेश सुपूर्द केला.यावेळी शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, तालुका अध्यक्ष दत्ता पवार उपस्थित होते.

Post a Comment