विषमतेची खान ..

भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आज 73वर्ष पूर्ण झाले आहे तरी ही भारतातील गरीब जनता सुखी व समाधानी आहे का हा मला नेहमी पडणारा प्रश्न आहे त्याच उत्तर अजूनही मिळालेल नाही त्याच कारण 21 व्या शतकातील स्वतंत्र नंतर सर्वात मोठी लागलेली कीड म्हणजे जातीयता अंधश्रद्धा अज्ञान पणा विषमता सर्वात मोठे व म्हणजे भ्रष्टाचार ह्या वर कोणीही काही बोलत नाही, त्यावर उत्तर शोधण्यची गरज वाटत नाही का असं प्रश्न समाजाला पडणं वावगं ठरू शकत नाही, समाजामध्ये लागलेली कीड म्हणजे भ्रष्टाचार आहे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी समजला वेठीस धरणे अथवा त्याच्या नावाखाली स्वतःचे पोट भरणे होय ग्रामीण भागात अजूनही काही गावात एका वेळच जेवण भेटणं शक्य नाही, कारण ते माहित नाही, ग्रामीण भागात काबाड कष्ट करण्याची खुप इच्छा असते पण त्याना काम मिळत नाही कवचीत  जर काम मिळाला तर  त्याच मोबदला योग्य मिळत नाही, हे नोटीस कोणीही करत नाही ना शासन ना प्रशासन ही गरीबाची शोकांतिक आहे, एखादा समाजपरिवतणवादी व्यक्ती भेटला तर तो कधी गायब होतो तर कधी मारला जाऊ शकतो याचा थांग पत्ता लागत नाही. 
शहरामधील नागरिक हे कधी ही हुशार व अनुभवी असतात पण शेतकर्यावाचुन काहीच करू शकत नाही जर शेतकरी व भूमिहीन शेतमजूर शेतांत काम नाही केला तर शहरातील जनते  वर उपासमारीची वेळ येऊ सकते याचा विसर पडता कामा नये जगाचा पोसिधा असणारा शेतकरी व शेतांत काम करणारे शेतमजुरांना वेळेवर त्याच्या मूलभूत गरजा (उदया. पाणी राहण्यासाठी स्वतः च घर त्या घरात चोवीस तास लाईट असणे कुणाला नको वाटत. जर त्याना मूलभूत हक्क म्हणजे त्याच्या मुलांना शिक्षण व उत्तम आरोय कधी मिळणार याच गणित कुणीही सोडवत नाही, याच गणित सोडवायच असेल तर कधीच सुटलं असत पण मध्यस्तिती असणारा जो स्वतःला गरीब जनतेचा दुवा म्हणून होणारा व्यक्ती त्याची इच्छा राहत नाही ग्रामपंचायत मध्ये दर वर्षला आर्थिक फ़ंड गावाच्या विकासाठी आलेला निधी सहज मिळावं. गरिबांना सहज पणे जीवन जगता यावे म्हूणन रेशन धान्य दुकान सुद्धा त्याना वंचित ठेवून पाहत आहे,  दर महा एक शिधापत्रिका धारकांना 35 किलो धान्य मिळतो, पण त्या कार्डधारकांना पुर्ण धान्य का मिळत नाही दुकानदाराचे म्हणणे की वरूनच पूर्ण धान्य दिल नाही. बाकी राहिलेले धान्य काळ्या बाजारात ट्रक भरून शेहराकडे धावतात तेव्हा त्याना कोणीही अडवत नाही गरीबाच्या तोंडातला घास पळवनाऱ्याना आडवनं कोणालाही जमत नाही, ते सोडा ग्रामपंचायत मध्ये गरीबासाठी आलेली योजना अन्न पुर्ण योजना असेल श्रवणबाळ योजना असेल, संजयगांधी निराधार असेल, कुटुंबतील कमवता व्यक्ती मरण पावला तर कुटुंब आर्थ साह्य योजना ही योजना मागे राहिलील्या व्यक्ती घरातील आलेलदुःख कमी व्हाव म्हणून सरकार योजना बनवल पण आत मधली मदस्ती मात्र स्वतःचे घर गाडी बँक बॅलेन्स हे सर्व मिळवून ते सुखाने मज्या मारतात, अहो गरीबाच विकास करणं सोपी गोष्ट नाही त्या साठी त्याला मन मोठ लागत श्रम व त्याग करण्याची तयारी, दुःख भोगण्याची इच्छा असावी लागते, गावात काम नाही म्हणून आपल्या म्हतारा आई बापाला सर्व नातेवाईक ला गावातच टाकून शेहराकडे धाव घेतात, जर त्या आई वडिलांना मुलाच्या मदतीची गरज भासली तर हे कुणाकडे बघायचे व कुणाला हाक मरायची हे सरकार ज्या गावात कामगारआहेत त्या गावात कामाची सोय करून द्यावि, युवकांना रोजगार निर्माण करून स्थलांतरीत होण्याऱ्या कामगार थांब वला तर बाहेर गावी जाणारे गावी थांबतील म्हाताऱ्या आई वडिलांना सोडून न जाता घरीच राहतील, घरीच राहिले तर म्हतारी वडिलांचा डोळ्यात अश्रू कशाला आले असते यांचे कोण विचार करणार. 
विचार करण्यासाठी आपल्याला पूर्ण पणे तयारी करावे लागते डाक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्या मताप्रमाणे हक्क मागून मिळत नाही ते मिळवाव लागत ते ही झगडून घ्यावं लागत त्या साठी आपल्याला आपल्या गावात एकजूट राहून अन्यायाला वाचा फोडणे, आपल्या समाजाला अन्यायाची परीभाषाची ओळख करून दयावे म्हणजे तो अन्याच्या विरोधात आवाज उठवनार. ग्रामीण भागातील आवश्यक असणारे प्रश्न ना कडे शासन व प्रशासनाची नजर ह्या गावाकडे वळवली पाहिजे हासाठी तेथील युवक जानकर कार्यकर्त व जनता एकत्र येवून प्रश्ननाची वाचा फोडन्यासाठी वातावरण तयार करणे ही काळाची गरज आहे.गाव व गावाचा विकास ह्यच्या ध्यास मनी बाळगिले पाहिजे विकासाची पहिली पायरी जिंकले असे मानायला पाहिजे त्या मध्ये गावाचा विकास करणे म्हणजे नेमक काय करावे  (1)
गावातील  मुलाच्या शिक्षनाचा स्थर कोणती व किती याची तपासणी करणे 
2)मानवाचा मूलभूत गरजा कोणती  त्यांना ते मिळतात का उदा. पाणी आरोग्य शिक्षण ई. 
3)व्यसन विषयी जागृती निर्माण करणे. 
4)बेरोजगारासाठी रोजगार उपलब्ध करून देणे  ह्या गोष्टी वर प्रामुख्याने लक्ष देण्यात यावे तेव्हा भुकेला अन्न बेरोजगाराला रोजगार तहानलेला पाणी ह्या  गोष्टी मिळेल  याची खात्री करून घेणं गरजेचं वाटत आहेत देशातील राजकारनातं सक्रिय असलेला नेता पुढारी यांना थोडं तरी वाटत नाही का ज्या जनतेनि आपल्या वर पूर्ण विश्वास करून पाच वर्ष जनतेची समाजाची सेवा करण्याची संधी मिळून दिले त्याचे ऋणी फेडायला साफ विसरून पैसाच्या पाटी सन्मानच्या पाटी लागत आहे
ग्रामपंचायत असो की जिल्हा परिषद वा पंचायत समिती अथवा विधानसभा राज्यसभा असो मग तुम्हाला ज्या मतदाराणी निवडून देऊन जनतेचप्रतिनिधीत्वा करण्याची संधी सबंधीत नेत्याला दिली मग त्याच काय कर्तव्य आहे गरीबाच  सर्वगिन विकास करण्याची ठेकेदारी तुमच्या जवळ आहे.तो पर्यंत जनतेला काय तुम्ही गुलाम समजलं की काय अशी चुक करू नका वेळ गेला नाही माणुसकीच नातं जपून ठेवा जनता ते विसरली तर तुम्ही कुठे राहणार याचा पता लागणार नाही समुद्र जो पर्यंत शांत आहे तो पर्यंत शांत आहे जर तो खव तळ तर सुनामी येते किती भोगाव लागेल हे तुम्हाला सांगायची गरज नाही नेता पुढारी यांना समाजाची व्याख्या काय आहे हे  तरी माहित आहे का जर माहित असेल तर जाणून बुजून समाजाला दिशाभूल करत आहेत जर माहित नसेल तर ते सिकण्यची गरज वाटत नाही का जर तुम्ही विचार केला तर समाजाचभलं होईल यांचा वरती होणाऱ्या अन्याय थांबेल विकासा पासून वंचित राहण्याची वेळ त्याच्या वर येणार नाही मुलाच्या शिक्षना साठी वन वन भटकंती करावं लागणार नाही उपाशी पोटी मरनाची वेळ ह्याच्या कुटूंबावर येणार नाही जसे की शिक्षण हे वाघिणीच दुध आहे जो प्राशन करेल तो गुरु गुर नार त्यामुळे अंधश्रद्धा जातीयतावेडगळ पणा समाजाबद्दल आदर आपुलकी विषमता याची ओळख होईल व अन्यायाला वाचा पोडण्याच काम ते स्वतः करतील याची मला खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र 

राजाराम ग वाघमारे 
 गोरेगाव मुंबई 


 संपर्क 84 51087190

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget