कळंब प्रतिनिधी .दि.२४/०५/२०२०
शाहीर विकास एडके मदतीच्या प्रतिक्षेत
----------------------------------------
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देश लाॅकडाऊन करण्यात आला आहे.सध्या लाॅकडाऊन चा चौथा टप्पा सुरू आहे .कोरोनाचा प्रार्दुभाव होऊ नये म्हणून शासनाने संचारबंदी लागू केली आहे या संचारबंदी चे पालन गावखेड्यातील सगळे नागरिक करत आहेत व शासनाला चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहेत .मात्र काही कलाकार ,आराधी मंडळ ,अशा खूप कलावंतांना यांचा फटका बसला बसत आहे .विकास एडके हे त्यातीलच पहाडी आवाजाचे शाहीर आहेत घरची परिस्थिती बेताची ,पोवाडे ,गाणे ,गाऊन , सामाजिक कार्यक्रमात गाणी गाऊन , लग्न समारंभात , आॅर्क्रेट् मध्ये गाणी ,पोवाडे , गाऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते ,पण सध्या लाॅकडाऊन मुळे सगळे कार्यक्रम बंद त्यामुळे त्यांची सध्या वाताहत होते आहे .व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला आहे . आपल्या जिल्ह्यांमध्ये लोककलावंत ,व कलावंत आहेत ,त्यांना लोककले शिवाय त्यांच्याकडे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी दुसरे साधन उपलब्ध नाही . त्यामुळे त्यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ होऊ लागली आहे . त्यामुळे शाहीर विकास एडके सध्या प्रशासनाच्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत . त्यामुळे त्यांना शासनाच्या वतीने तात्काळ अन्नधान्य ,आर्थीक मदत देण्यात यावी अशी मागणी शाहीर विकास एडके व लाल पँथर संघटनेचे भाई बजरंग ताटे यांच्या वतीने करण्यात आली आहे .

Post a Comment