नगराध्यक्षा सुवर्णा सागर मुंडे व उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

कळंब (प्रतिनिधी)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक लोक प्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणा यांचा समन्वय असावा अशा मागणीचे निवेदन नगराध्यक्षा सुवर्णा सागर मुंडे व उप नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

कोराना व लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेतील प्रत्येक माणुस हा आप आपल्या परीने या महामारीच्या युध्दात योगदान देत आहे. अशा परिस्थितीत ताळमेळ घालण्यासाठी स्थानिक लोक प्रतिनिधीचा सक्रिय सहभाग सामावून घेणे आवश्यक आहे. 
स्थानिक लोक प्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणा यांचा समन्वय साधुन संपूर्ण जिल्हा ग्रीन झोन मध्येच राहिल अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. 
   राज्य मार्ग व जिल्हा मार्ग मिळुन कळंब शहरात येणारे पाच मार्ग व इतर तीन गुप्त मार्ग अशा आठ ठिकाणी बॅरिगेट आणि सिसिटीव्ही कॅमेरे लावले जातील तसेच पालिकेचा एक कर्मचारी व पोलीस यंत्रणेचा एक कर्मचारी पुर्ण वेळ थांबवता येतील. सिसिटीव्ही कॅमेरे मार्फत पालिकेतील कंट्रोल रुममध्ये निगराणी करता येईल. शहरातील पालिकेच्या मालमत्ताकर वसुलीच्या वर्गवारी नुसार चार झोन आहेत. या चार झोन मध्ये वेगवेगळ्या रंगाचे पास देता येतील, प्रत्येक दोन झोन ला एक वेळी अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडण्यासाठी आठवड्यातील दोन किंवा तीन दिवस दिले तर, प्रत्येक झोनमध्ये अंदाजे १२०० घरे आहेत. प्रति घर एकच पास दिलेला असल्यामुळे झोन चे मिळून जास्तीत जास्त २४०० लोक बाजारपेठ मध्ये आढळून येतील त्यामुळे गर्दी राहणार नाही, पोलीस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा, सेवाभावी संस्था यांचे योग्य तेथे सहकार्य घेऊन पालिकेच्या यंत्रणाव्दारे सहज सर्व सुरळीत करता येईल. पास बनवणे, वाटणे, बॅरिगेट उभा करणे व सिसिटीव्ही कॅमेरे बसविणे हे सर्व काम अंदाजे दोन लाख रुपये खर्च होईल असा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासाठी उपाययोजना संदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे नगराध्यक्षा सुवर्णा सागर मुंडे व उप नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी पाठवला आहे. यावर आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget