ग्रामीण कलाकार महादेव अंगरखे ढोलकीपट्टू

(पत्रकार सतिश टोनगे , कळंब)
 
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील महादेव कुंडलिक अंगरखे हा ग्रामीण भागातील कलाकार असुन अवघे ४ पर्यंत शिक्षण झालेला.तरुन घरची परिस्थीती बेताची..घरात आठराविश्व दारिद्र्य घरात कुणी जास्त शिकलेलं नाही.घरी असण-या म्हशी घेऊन रानावनात म्हशी चारायला घेऊन महादेव जात असे.तहान लागली तर एक फायबरची वॉटर बॅग गळ्यात आडकुन म्हशीवर बसुन तो जात असे..वेळ घालवण्यासाठी मराठी हिंदी गाणे म्हणत असे.गाण्याला संगीत म्हणजे गळ्यात आडकवलेली वॉटर बॅग दोन काड्या घेऊन तो वाजवत असे....वॉटर बॅगवर वाजवत असताना तालाची ओळख झाली...म्हशी राकणरा महादेव बॅन्डमध्ये खुळखुळा वाजवु लागला...पुढे खुळखुळा वाजवणारा महादेव ट्रम,ढोल,हलगी वाजवु लागला.आराधी मेळ्यात हालगी वाजवत ढोलकी वाजवायला शिकले पाहिजे असा विचार घोळु लागला....आराधी मेळ्यात बसुन देवीची गाणी म्हणु लागला..गायन वादनचा मिलाप झाल्यामुळे अस्सल कलाकार आकार घेऊ लागला.आवाज गोड होता.संगीतातली थोडी माहिती झाली.वेगवेगळ्या चालीवर देवीच्या गाण्याची तो रचना करु लागला.आराधी मेळ्यात ढोलकी वाजवणारा पुढे,शाहीरी कार्यक्रम,कलाकेंद्रात,ढोलकी वादक म्हणुन फिरु लागला.दहिफळ सारख्या ग्रामीण भागात राहुन कलेची उपासना करत कलेवर जिवन जगणारा कलाकार बॅन्डमध्ये ट्रम,ढोल,वाजवुन आपल्या संसाराचा गाडा हाकत आहे.डिजीटल बॅन्डमुळे मुळ कला लुप्त पावत आहे.कलेला राज आश्रय मिळत होता.काळानुसार खुप बदल होत आहेत.बदलत्या काळात कलेवर जगणारे ग्रामीण कलाकार मात्र कला टिकवुन आहेत.हातावर पोट असल्यामुळे कलेवर उपजिवीका भागवत आहेत.लॉक डाऊन मुळे.लग्न सरई बंद झाली.वर्षातुन तीन महिने बॅन्ड पथकात कला सादर करुन चार पैसं पदरात पडतात.परंतु यावर्षीचा शिजन वाया केला.कलेवर जगणा-या ग्रामीण कलाकारावर मात्र उपासमारीची वेळ येत आहे.सरकारने ग्रामीण भागातील कलाकारासाठी
आर्थीक मदत केली पाहिजे.कलेवर उपजिवीका भागविणा-या कलाकारांना हातभार लागेल...

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget