प्रशासनाच्या आव्हानाला जनतेचा चांगला प्रतिसाद.

कळंब (प्रतिनिधी) 
गोरगरिबांच्या मदती करीता महसूल प्रशासनाने जिवनाश्यक वस्तू (किराणा साहित्य किट) देण्याचे अवाहन केले होते. त्याला प्रतिसाद मिळत असून तहसील कार्यालयाकडे जीवनावश्यक वस्तूंचे ३८५६ कीट जमा झाले आहेत. तर यातील २५१३ किट वाटप करण्यात आले आहेत. 

लॉकडाऊन झाल्यामुळे उद्योगधंदे व लहान लहान उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 
काहीना रेशन कार्ड नसल्याने स्वस्त धान्य वितरण प्रणालीचा लाभ मिळत नाही. काही कुंटूबापुढे यामुळे रोजगार ही नाही अन् सरकारी योजनेचा लाभ ही नाही अशी बिकट स्थिती ओढवली आहे. या लोकांना दिलासा देण्यासाठी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी मदत करण्याचे आवाहन केले होते. याला तालुकाभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामपंचायत, शासकीय कर्मचारी संघटना, खाजगी व्यक्ती यासह अनेकांनी प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार शासनाकडे मदत स्वरूपात धान्य व जीवनावश्यक वस्तुचे कीट जमा केले आहे. 

      कळंब तहसील कार्यलायातील पुरवठा विभागात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. येथे मदत स्वरूपात आलेली किराणा साहित्याचे किट जमा करण्यात येत आहेत. मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून गरजवंताची नावे मागवण्यात येत आहेत. याची पडताळणी करूनच ही मदत देण्यात येत आहे. 
 
महसूल प्रशासनाकडे जमा केलेली जीवनावश्यक वस्तुंच्या किटची मदत वितरीत करण्यासाठी उप विभागीय आढीकरी आहिल्या गाठा ल ,तहसीलदार मंजूषा लटपटे, नायब तहसीलदार परविन पठाण, अस्लम जमादार यांनी नियोजन करत असुन, ही मदत वाटप करण्याचे काम चालू आहे. जीवनावश्यक वस्तूंचे ३८५६ कीट जमा झाले आहेत. तर यातील २५१३ किट वाटप करण्यात आले आहेत. तर १३४३ शिल्लक आहे. आणखीन मदतीची आवश्यकता असुन दानशुर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करण्याची गरज आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget